पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केजरीवालांच्या शपथविधीसाठी इतर मुख्यमंत्र्यांना किंवा कोणत्याही पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण नाही

शपथविधीसाठी इतर मुख्यमंत्र्यांना आमंत्रण नाही

आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधीसाठी इतर कोणत्याही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना किंवा इतर पक्ष्यांच्या नेत्यांना बोलवण्यात येणार नाही असं आपचे नेते गोपाल राय यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू

 अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी रविवारी १६ फेब्रुवारीला पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यावेळी केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली आपनं ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवला. भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांचं आव्हान मोडीत काढत आपनं दिल्लीत विजय मिळवला. 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञाला अटक

येत्या रविवारी रामलीला मैदानात केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. मात्र या सोहळ्यात कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा कोणत्याही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना बोलवण्यात येणार नाही.  हा सोहळा केवळ दिल्ली आणि दिल्लीवासीयांपुरताच मर्यादित राहणार आहे, असं राय यांनी स्पष्ट केलं आहे. केवळ दिल्लीच्या लोकांनाच या सोहळ्यासाठी आमंत्रण असेल असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

डोंबिवली : मारहाणीत नाही तर हृदयविकाराच्या झटक्यानं झाला मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:No chief minister or political leader from other states will be invited for the Arvind Kejriwal oath taking ceremony