पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकबाबतच्या भूमिकेत बदल नाही- परराष्ट्र मंत्रालय

रवीश कुमार (ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राबाबत परराष्ट्र मंत्रालयाने खुलासा केला आहे. राजनैतिक शिष्टाचारानुसार, पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या शुभेच्छांना उत्तर द्यावे लागते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, भारत पाकिस्तानसह आपल्या सर्व शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवू इच्छितो. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले की, सामान्य संबंधांसाठी विश्वासाचे वातावरण तयार होणे गरजेचे आहे. दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरण असले पाहिजे. दरम्यान, पाकिस्तान माध्यमांनी या पत्राच्या हवाल्याने भारत पाकबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते.


रवीशकुमार यांनी पाकच्या दाव्यावर म्हटले की, आमच्या भूमिकेत कोणताच बदल झालेला नाही. आम्ही फक्त राजनैतिक शिष्टाचार लक्षात घेऊन पाक पंतप्रधानांच्या पत्राला उत्तर दिले. पाक दहशतवादाविरोधात जोपर्यंत कारवाई करत नाही. तोपर्यंत त्यांच्याबरोबर चर्चा नाही, ही गोष्ट आम्ही अनेकवेळा स्पष्ट केली आहे. आम्हाला तात्पुरती कारवाई नकोय. पाकने यापूर्वी अनेकवेळा अशी कारवाई केली आहे.