पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिर प्रश्नावर पक्षकारांमध्ये एकमत नाही, मध्यस्थ समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर

राम मंदिराचा प्रश्न (प्रातिनिधिक छायाचित्र)

अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय मध्यस्थ समितीने आपला अहवाल गुरुवारी न्यायालयात सादर केला. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांशी चर्चा करून सामोपचाराने हा प्रश्न सोडवता येईल का, याचे जबाबदारी मध्यस्थ समितीवर होती. पण या प्रश्नावर सर्व पक्षकारांमध्ये एकमत होऊ न शकल्याचे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. या समितीच्या कामकाजाशी संबंधित व्यक्तीने 'हिंदुस्थान टाइम्स'ला ही माहिती दिली.

जम्मू काश्मीरमध्ये 28 हजार अतिरिक्त जवान तैनात

मध्यस्थ समितीने बंद लिफाफ्यात आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला दिला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राम मंदिराच्या प्रश्नी हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनी एकत्रितपणे न्यायालयाच्या बाहेर तोडगा काढावा, या उद्देशाने ही समिती नेमण्यात आली होती. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नाझीर यांचे पाच सदस्यीय घटनापीठ समितीचा अहवालावर आज पुढील सुनावणी करणार आहे. या प्रकरणी पुढे काय करायचे, हे न्यायालय आजच निश्चित करणार आहे. 

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा ड्युटीवरील पहिला फोटो व्हायरल

जर मध्यस्थ समितीच्या अहवालात चर्चेतून तोडगा निघू शकला नसल्याचे म्हटले असेल, तर न्यायालय या प्रकरणावर पुढील सुनावणी सुरू करणार आहे. 
१७ जुलै रोजी या प्रकरणावर झालेल्या सुनावणी न्यायालयाने मध्यस्थ समितीला १ ऑगस्टपर्यंत आपला अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. मध्यस्थ समितीच्या कामकाजातून काय निष्पन्न झाले, याची माहिती या अहवालाच्या माध्यमातून देण्याचे निर्देश देण्यात आले होते.