पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निजामुद्दीन मरकज: चीनसह ६७ देशातून आले होते २०४१ नागरिक

निजामुद्दीन मरकज कार्यक्रम

भारतामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन सुरू असताना सुद्धा दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचे मुख्यालय असलेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मार्च महिन्यात चीनसह ६७ देशातील जवळपास २०४१ परदेशी नागरिक आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खळबळजनक खुलासा या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने तयार केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सर्वात जास्त लोकं इंडोनेशिया, बांगलादेश आणि थायलंडची होती. 

भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग तुलनेत कमी, इराणमध्ये सर्वाधिक

दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या अहवालात असे देखील म्हटले आहे की, देशातील १८ राज्यांमधील लोकं मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. याचा तपास देखील दिल्ली पोलिसांकडून सरु आहे. यामध्ये तामिळनाडूतील ५०१, आसाममधील २१६, उत्तर प्रदेशमधील १५७, महाराष्ट्रातील १०९, हरियाणातील २२, उत्तराखंडमधील ३४, मध्य प्रदेशमधील १०७, बिहारमधील ८६, पश्चिम बंगालमधील ७३, हैदराबादमधील ५५, झारखंडमधील ४६ आणि कर्नाटकातील ४५ जण सहभागी झाले होते.  

कोरोनावर लस निर्मितीसाठी DNA-RNA आधारित पद्धतीमुळे वेग

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली गुन्हे शाखेने देशभरातील जवळपास सर्व राज्यातील पोलिसांना हा आकडा सांगितला आहे. तसेच विमानतळावरही याबाबत माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, देशात तबलीगी जमातचा मकरज ज्या भागात आहे तेथे छापा टाकून या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. याठिकाणी जी लोकं सापडत आहेत त्यांची तपासणी करुन त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले जात आहे. 

रामनवमी निमित्त पंतप्रधान मोदींचे टि्वट, म्हणाले, जय श्रीराम !

दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये १५, १६ आणि १७ मार्च रोजी कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच देशभरात मोठी खळबळ उडाली. या क्रार्यक्रमात इंडोनेशियाचे ५५३, बांगलादेशचे ४९७, थायलंडचे १५१, किरगिस्तानचे १४५, मलेशियाचे ११८, चीनचे ९ आणि अन्य देशाताली ५७७ नागरिक सहभागी झाले होते. यामधील अनेक जण हे पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. अशात ते धार्मिक कार्यक्रमात कसे सहभागी झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांचा व्हिसा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश