पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाहीः नितीश कुमार

नितीश कुमार

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचदरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या राज्यात एनआरसी लागू करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरले

देशातील इतर भागासह बिहारमध्येही सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीचा तीव्र विरोध होत आहे. राज्यात होत असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले की, एनआरसी बिहारमध्ये लागू केले जाणार नाही. 

विशेष म्हणजे नागरिकत्व कायद्याच्या दुरुस्तीला जेडीयूने समर्थन दिल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी जाहीर विरोध केला होता.

पाटणा येथे नितीश कुमार यांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी म्हटले की, सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे जास्त अडचणी येणार नाहीत. पण हे एनआरसीबरोबर नसावे. मुख्यमंत्र्यांनी आपण एनआरसीबरोबर नसल्याचे म्हटले आहे. जर एनआरसी नसेल तर सीएएबाबत अडचण नसेल. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे हे नागरिकत्व देणारे विधेयक आहे आहे घेणारे नाही. पण जर तुम्ही हे एनआरसीशी जोडले तर तर विभाजनकारी होऊन जाईल.

सिंचन घोटाळाः अजित पवारांच्या क्लीनचिटवर फडणवीसांचा आक्षेप

जेडीयूने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आपल्याच पक्षावर टीका केली होती. त्यांनी २०१५ मधील विधानसभा निवडणुकीची आठवण करुन दिली होती. सीएएला दिलेल्या पाठिंब्याबाबत विचार करण्याचे पक्षाला त्यांनी आवाहन केले होते.