पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NDA कडून पंतप्रधान पदाच्या उमेदवारपदी मोदींचीच निवड

दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दोन दिवस अगोदर मंगळवारी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात भाजपच्या घटक पक्षातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) दिग्गजांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. एऩडीएच्या घटक पक्षांच्या या बैठकीत नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. 

Lok Sabha election 2019 Exit Poll: बहुतांश एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा 'नमो-नमो'

स्नेहभोजनापूर्वी पंतप्रधान नरेंद्रम मोदी आणि अमित शाह यांनी दिल्ली स्थित भाजप कार्यालयात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पाच वर्षांतील सेवेबद्दल नेत्यांचे आभार मानण्यात आले. बैठकीनंतर अमित शहा यांनी ट्विटच्या माध्यमातूनही आभार व्यक्त केले. " मी मोदी सरकारच्या टिममधील सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. गेल्या पाच वर्षात त्यांनी मेहनत आणि जबाबदारीने काम केले. मोदींच्या नेतृत्वाखाली हा सिलसिला कायम ठेवू." अशा शब्दांत त्यांनी पुन्हा मोदी सरकार सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला.  

विरोधकांना EVM ची चिंता, २२ पक्षांनी EC ला दिल्या दोन आयडिया

एग्झिट पोलच्या अंदाजानुसार मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे दिसत आहेत. एनडीएने हे अंदाज खरे ठरतील असा विश्वास व्यक्त केला आहे. २०१४ मध्ये ३३६ जागा मिळवणारी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा एकदा तीनशेचा टप्पा पार करत असल्याचे भाकित एक्झिट पोल दर्शवत आहेत.  दुसरीकडे २२ विरोधी पक्षांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.