पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाहतूक नियम: दंड आकारणी महसूल गोळा करण्याची स्किम नाही- गडकरी

नितीन गडकरी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही महसूल उत्पन्न मिळवण्याची योजना नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. केंद्राने नव्याने लागू केलेल्या  वाहतूक नियमांनुसार मोठ्या दंडासह कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक उल्लंघनप्रकरणातील कारवाई अंतर्गत सध्या आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये काही बदल करण्यात येणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारला होता. 

ओव्हरलोडिंगमुळे ट्रक चालकाला तब्बल १,४१,७०० रुपयांचा दंड

एएनआयच्या वृत्तानुसार, यावर गडकरी म्हणाले की, नव्या नियमानुसार करण्यात येणारी दंड आकारणीची कारवाई ही महसूल उत्पन्नाची योजना नाही. १ लाख ५० हजार लोकांनी अपघातामध्ये जीव गमावला आहे. आपल्याला हा प्रश्न गंभीर वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

'सरकारला पैशांची लालसा नाही, वाहतूक नियमांचे पालन व्हावे'

१ सप्टेंबरपासून देशभरात नवे वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या निमयानुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोदात पूर्वीपेक्षा कितेक पटीने अधिक प्रमाणात दंडाची आकारणी करण्यात येत आहे. गुजरात राज्य सरकारने वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर केंद्राने वाढवलेल्या दंडाची रक्कम २५ ते ९० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.