पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार टिकणार नाही: गडकरी

नितीन गडकरी

राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहे. तिन्ही पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरु आहे. राज्यात लवकरच नवे सत्ता स्थापन होईल अशी चिन्ह दिसत आहेत. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थापनेवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार टिकणार नाही असे गडकरी यांनी सांगितले आहे.

पवारांनी राजकारणातील चाणक्यावर केली मात, NCPचा भाजपला टोला

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेनेच्या विचारधारेला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसच्या विचारधारेला शिवसेनेचा विरोध आहे. तर राष्ट्रवादीचा सुध्दा शिवसेनेच्या विचारधारेला विरोध आहे. हे सरकार टिकणार नाही आणि त्यामुळे ते महाराष्ट्रात स्थिर सरकार देऊ शकणार नाही, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. 

सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांचा पाठिंबा: जयंत पाटील

महाराष्ट्रासाठी अस्थिर सरकार ही चांगली बाब नाही, असे गडकरी यांनी सांगितले. तसंच, गडकरी यांनी शिवसेना-भाजप युती तुटल्याबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजप- सेनाची युती हिंदुत्वाच्या विचारावर आधारीत होती. आमच्या विचारात आजही मतभेद नाही. भाजप-सेनेची युती तुटणे हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मोठं नुकसान आहे, असे गडकरी यांनी सांगितले. 

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nitin gadkari says shivsena congress ncp alliance they will not be able to give maharashtra a stable government