पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि नितीन गडकरींनी सांगितले त्यांच्या मंत्रालयाचे सर्वात मोठे अपयश

रस्ते अपघातांचे प्रमाण भारतात जास्त आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

आपल्या कार्यक्षमतेसाठी आणि वेगाने निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात आपल्या मंत्रालयाला गेल्या पाच वर्षांत नक्की कोणत्या मुद्द्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले, याची मनमोकळेपणाने माहिती दिली. गेल्या पाच वर्षांच्या काळात रस्त्यावरील अपघात आणि त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट करण्यात मंत्रालयाला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. 

'मुनगंटीवार के हसीन सपने' पुस्तकाची प्रस्तावना मीच लिहीन : राऊत

'मिंट आयडिया गुंतवणूक परिषद आणि पुरस्कार' सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. रस्ते अपघातांच्या संख्येत अल्पशी घट झाली असली तरी परिस्थिती अजूनही गंभीरच असल्याचे त्यांनी सांगितले. 

नितीन गडकरी म्हणाले, सद्यस्थिती खूपच भीषण आहे. सध्या वर्षाला रस्त्यावर पाच लाख अपघात होत असून, त्यामध्ये दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागताहेत. गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची टक्केवारी कमी झाली आहे. माझ्या मंत्रालयात बाकी सर्व काही उत्तम सुरू आहे. फक्त रस्ते अपघात आणि त्यामध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या हे आमच्यासाठी मोठे अपयश आहे. 

Maharashtra Budget 2020: ठाकरे सरकारचा 'महा'घोषणांचा अर्थसंकल्प

जागतिक रस्ते सांख्यिकी अहवाल २०१८ नुसार १९९ शहरांच्या यादीत रस्ते अपघातांच्या संख्येत भारत वरच्या स्थानावर आहे. भारतानंतर या यादीमध्ये चीन आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. जगात रस्ते अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये जवळपास ११ टक्के लोक एकट्या भारतातील आहेत.