पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; १०२ लाख कोटींच्या योजनांची घोषणा

निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९ वर्षाच्या अखेरच्या दिवशी देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये १०२ लाख कोटींच्या गुंतवणूक योजनांची मोठी घोषणा केली. सीतारामन यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रामधील गुंतवणूक दुप्पट करण्याचे या माध्यमातून जाहीर केले. गेल्या सहा वर्षांमध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये केंद्र आणि राज्यांकडून एकत्रितपणे ५१ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामध्ये येत्या पाच वर्षांत दुप्पट वाढ करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पायाभूत सुविधांच्या क्षेत्राची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती गटाचा अहवाल निर्मला सीतारामन यांनी प्रकाशित केला. गेल्या चार महिन्यांत या क्षेत्रातील अनुभवी आणि भागधारकांशी सविस्तर चर्चा या कृती गटाने केली. त्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला असून, त्यामध्ये १०२ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक पायाभूत प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील गुंतवणूक १०० लाख कोटीपर्यंत वाढविण्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच केले होते. त्यानंतरच हा कृती गट नेमण्यात आला होता.

या कृती गटाने राष्ट्रीय पायाभूत सुविधांतर्गत निश्चित केलेल्या प्रकल्पांमध्ये केंद्र आणि राज्य प्रत्येकी ३९ टक्क्यांची गुंतवणूक करणार आहे. तर उर्वरित २२ टक्के गुंतवणूक खासगी क्षेत्रातून करण्यात येईल. 

प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर; राजीनाम्याचा निर्णय मागे

अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, सर्व १८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर काम करण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत खासगी क्षेत्राचा वाटा वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. 

'मुंबई मेट्रो'च्या एमडी अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती

देशातील पायाभूत सुविधा विकसित करणे ही सरकारची प्राथमिकता आहे, असे देखील निर्मला सीतारामन यांनी सांगितले. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार २०२० च्या उत्तरार्धात 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट'चे आयोजन करणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले. 

'देश तोडण्याचं इंग्रजांचं अर्धवट काम भाजप पूर्ण करतंय'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nirmala sitharaman says to make infrastructure investment worth rs 100 lakh crore for the next five years