पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धन्यवाद! मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावर सीतारामन यांची प्रतिक्रिया

मनमोहन सिंग आणि निर्मला सीतारामण

अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाल्याचे विधान रविवारी केले. याशिवाय त्यांनी अर्थव्यवस्थेची मरगळ दूर करण्यासाठी सरकारने अभ्यास व्यक्तींशी चर्चा करण्याचा सल्लाही सरकारला दिला होता.

जीडीपीची ५ टक्क्यांवर घसरण, मागील ६ वर्षांचा नीचांक

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मनमोहन सिंग यांनी सरकारवरच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. धन्यवाद! या वक्तव्याची दखल घेवू या मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने देशात आर्थिक मंदी असल्याचे स्वीकारते का? असा प्रश्नही यावेळी सीतारामन यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, मी व्यापार क्षेत्रातील लोकांशी चर्चा करत आहे. त्यांच्याकडून सल्ला आणि सूचना घेतल्या जात आहेत. तसेच त्यांना सरकारकडून काय अपेक्षित आहे, याची देखील माहिती घेत आहे. यापूर्वी दोनवेळा असे केले आहे. आणि यापुढेही करेन, अशा शब्दांत त्यांनी सरकार आर्थिक परिस्थितीसंदर्भात गांभीर्याने पावले उचलत असल्याचे सांगितले.  

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा अर्थव्यवस्थेला फटका : मनमोहन सिंग 

उल्लेखनिय आहे की, चालू आर्थिक वर्षातील अर्थिव वृद्धीचा घट ५ टक्क्यांपर्यंत घसरल्याचा दाखला देत मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. सरकारच्या चुकींच्या धोरणामुळे देशात मानव निर्मित आर्थिक संकट घोंगावत असल्याचे त्यांनी म्हटले होते. भारतीय अर्थव्यवस्थेत गतीमान होण्याची क्षमता आहे. पण त्यासाठी योग्य धोरणे राबवावी लागतील, असा उल्लेखही मनमोहन सिंग यांनी केला होता.