पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गृहनिर्माण क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्राने २५ हजार कोटी देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी १० हजार कोटी निधी मंजूर देखील केला आहे. उर्वरित निधी एलआयसी हौसिंग आणि एसबीआयच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला आहे. बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

आता प्रियांका चतुर्वेदींकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर

गृहनिर्माणक्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी स्वस्त आणि अत्यंत सोप्यापद्धतीने हा निधी दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कमी किंमतीत घरे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.  रेरामधील अपूर्ण असलेल्या प्रकल्पाला यातून सहकार्य केले जाणार आहे. प्रकल्पपूर्ण होईपर्यंत त्यांना मदत पुरवली जाणार असल्याने गृह खरेदीदारांना लवकरात लवकर घरे उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पुन्हा भाजपचे सरकार नको, हुसेन दलवाईंनी घेतली संजय राऊतांची भेट

अ‍ॅडव्हान्स रक्कम देऊनही घराचा ताबा मिळालेला नाही, यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. साधारणपणे १ हजार ६०० गृह प्रकल्प रखडले असून या निर्णयानंतर या प्रकल्पाला गती मिळेल, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.