पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मंदीवर बोलण्यापूर्वी तुमच्या काळातील अर्थमंत्र्यांशी चर्चा करा'

निर्मला सितारामण आणि राहुल गांधी

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) केंद्र सरकारला लाभांश आणि अतिरिक्त निधीतून १.७६ लाख कोटी देण्याचा निर्णय घेतला. यावरुन काँग्रेस आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. मध्यवर्ती बँकेने निधी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पंतप्रधान मोदींनवर निशाणा साधला. त्यानंतर आता निर्मला सीतारामण यांनी राहुल गांधींवर तोफ डागली. 

PM मोदींचं कौतुक करणं शशी थरुर यांना महागात पडणार

सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेतून चोरी केली, हा आरोप करण्यापूर्वी राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकाळातील अर्थमंत्र्यांसोबत चर्चा करायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी 'चोर', 'चोरी' या शब्दांचा प्रयोग करुन सरकारवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला.  यात ते अपयशी ठरले आहेत. केंद्राला 'आर्थिक आपत्ती'च्या तरतुदीसाठी निधी देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   

 

अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर होणार?, RBI सरकारला देणार १.७६ लाख कोटी

राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना आपल्या सरकारने निर्माण केलेल्या आर्थिक मंदीची कल्पना नसून यावर काय उपाय करावेत, हे देखील त्यांना सूचत नाही. आरबीआयमधून चोरी करुन समस्या मिटणार नाही, असा दावा राहुल गांधींनी ट्विटमधून केला होता.