पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर माझ्या मुलीला न्याय मिळाला; निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

निर्भयाची आई

अखेर माझ्या मुलीला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिले आहे. दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने निर्भया प्रकरणातील चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केले. कोर्टाच्या या निर्णयानंतर तब्बल ७ वर्ष मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या निर्भयाच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे.

निर्भयाच्या दोषींना गय नाही, २२ जानेवारीला ७ वाजता होणार फाशी

कोर्टाच्या निर्णयानंतर निर्भयाच्या आईला अश्रू अनावर झाले. 'माझ्या मुलीला अखेर न्याय मिळाला आहे. चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यात आल्यामुळे देशातील महिला सशक्त होतील. कोर्टाच्या या निर्णयामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी बळकट होईल', अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे. 

कोर्टाच्या निर्णयावर खुश; निर्भयाच्या वडिलांची प्रतिक्रिया

दिल्लीमध्ये २०१२ मध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींच्या डेथ वॉरंटप्रकरणी पतियाला हाऊस कोर्टात आज सुनावणी झाली. कोर्टाने चारही आरोपींचे डेथ वॉरंट जारी केले. चारही दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. चारही आरोपींना सुनावणीवेळी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. 

'फ्री काश्मीर'चे पोस्टर का झळकावले, मेहक प्रभूने केला खुलासा