पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण : आता दोषींच्या फाशीची अंमलबजावणी अटळ

 वकील सीमा कुशवाहा

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार दोषींपैकी पवन कुमार गुप्ताची दया यचिका फेटाळून लावली. यापूर्वी राष्ट्रपतींनी या प्रकरणातील तिघांची दया याचिका फेटाळली होती. राष्ट्रपतींनी पवनची याचिका फेटाळल्यानंतर दोषींसमोरील सर्व कायदेशीर पर्याय आता संपले आहेत, असे निर्भयाच्या कुटुंबियांच्या वकिलांनी म्हटले आहे.   

निर्भया प्रकरण: दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

राष्ट्रपतींच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर निर्भयाच्या कुटुंबियांकडून दोषींच्या फाशीसंदर्भात नव्याने याचिका दाखल करण्यात येणार आहे. निर्भयाच्या कुटुंबियांच्या वकील सीमा कुशवाहा यांनी यासंदर्भातील माहिती दिली. त्या म्हणाल्या की, दोषींकडे असणारे सर्व कायदेशीर पर्याय आता संपले आहेत. दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा (डेथ वॉरंट) देण्याबाबत दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. यावेळी न्यायालयाकडून जी फाशीची तारीख दिली जाईल, ती अंतिम असेल आणि त्यादिवशी त्यांना फाशी निश्चित होईल, असेही वकील सीमा कुशवाहा यांनी सांगितले. 

चिथावणीखोर वक्तव्ये, सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली हायकोर्टावर ताशेरे

दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या दोषींच्या मानसिक आणि शारिरिक स्वास्थ तपासणीसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकारी अयोगाला  (एनएचआरसी) आदेश देण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणीला नकार दिला आहे. दोषींना पहिल्यांदा राष्ट्रीय मानवाधिकार अयोगासमोर हजर करावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी ३ मार्च रोजी सकाळी साडे सहावाजता दोषींना फाशी देण्याच्या निर्णयावर  पटियाला हाउस न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली होती.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Nirbhaya s parents will file fresh application for issuing death warrant of the convicts in Delhi court