पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण: पोलिसांच्या कामगिरीचे होतेय कौतुक

हैदराबाद पोलिस

हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील चारही आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक केले जात आहे. आरोपींचा खात्मा केललेल्या पोलिसांवर पुष्पवृष्टी करत तेलंगणातील जनतेने त्यांचे आभार मानले आहे.

आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना खांद्यावर उचलून घेतले. तसंच फटाके वाजवत, त्यांना पेढे वाटत त्यांचे आभार मानन्यात आले. 

हैदराबाद येेथे महिलांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांना सॅल्यूट केला तसंच त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना राखी बांधली. पीडितेला न्याय मिवळून दिला असल्याचे मत या महिलांनी मांडले आहे. या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

हैदराबाद पोलिसांनी अत्यंत धैर्यवान कामगिरी केली असल्याची प्रतिक्रिया बाबा राम देव यांनी दिली आहे.  पीडितेला न्याय मिळाला आहे. या प्रकरणावरील कायदेशीर प्रश्न वेगळी बाब आहेत. परंतु मला खात्री आहे की देशातील लोक शांततेत आहेत.

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचे एन्काऊंटर केल्यानंतर बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत आहेत. मात्र उत्तर प्रदेश सरकार झोपले आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी. पण दुर्दैवाने येथे गुन्हेगारांना पाहुण्यांसारखे वागवले जात आहे. यूपीमध्ये सध्या जंगलराज सुरु असल्याचे मायावती यांनी सांगितले.