पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरोपींना दिलेल्या शिक्षेवर मी खूश: निर्भयाची आई

तेलंगणा पोलिस

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. या घटनेवर निर्भयाची आई आशा देवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'आरोपींना दिलेल्या शिक्षेवर मी खुश आहे. तेलंगणा पोलिसांनी चांगले काम केले.', असल्याचे आशा देवींनी सांगितले.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

आशा देवी यांनी पुढे असे सांगितेल की, पीडितेला लवकर न्याय मिळाल्याचे समाधान आहे. आरोपींचे एन्काऊंटर केलेल्या तेलंगणा पोलिसांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी माझी मागणी आहे. सरकार आणि देशाच्या न्याय व्यवस्थेला मी आवाहन करते की निर्भयाच्या दोषींना देखील लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हैदराबाद बलात्कार : जिथे ते पाशवी कृत्य केले तिथेच सर्व मारले गेले...

हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील चारही आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे. शुक्रवारी सकाळी सर्व आरोपींना ज्या ठिकाणी त्यांनी पाशवी कृत्य केले होते तिथे नेण्यात आले होते. त्या ठिकाणावरुन आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही जण मारले गेले. 

पतीच्या मृतदेहासोबत पत्नी तब्बल २४ तास राहिली कारण...