निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या अंमलबजावणीला तिसऱ्यांदा स्थगिती मिळाली आहे. या प्रकरणातील चारही दोषींना मंगळवारी, ३ मार्च २०२० रोजी सकाळी सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार होती. पण दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर निर्भयाची आई आशा देवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. सरकार आणि देशातील चुकीच्या न्याय प्रणालीमुळे लेकीला न्याय मिळत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
निर्भया प्रकरण : दोषींच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत पुन्हा
लेकीवर अत्याचार करणाऱ्यांना फासावर लटकवत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने ठाम भूमिका घेऊन दोषींना फाशी देण्यास विलंब होत असल्याची बाजू न्यायालयात मांडावी, असेही त्यांनी म्हटले आहे. सोमवारी तिसऱ्यांदा दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे.
'चीन, इराण, सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा'
या प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणी त्याच्यासह इतर तीन दोषींना मंगळवारी फाशी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी विनय शर्मा, मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर यांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कायद्याच्या तरतूदींच्या आधारे आरोपींचे वकील फाशीची शिक्षा लांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे.