पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भयाच्या आईला दोषींच्या वकिलांनी दिले आव्हान, म्हणाले...

निर्भयाची आई

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्भयाची आई माध्यमांसमोर भावुक झाल्या. दोषींचे वकील ए पी सिंह यांनी मला आव्हान देत सांगितले की दोषींना कधीच फाशी होणार नाही, असे निर्भयाच्या आईने सांगितले. तसंच, मी  माझा लढा सुरुच ठेवणार आहे. सरकारला दोषींना फाशी द्यावीच लागेल, असे त्यांनी सांगितले.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला स्थगिती

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने स्थगिती दिली. पुढच्या आदेशापर्यंत फाशी देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. १ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात येणार होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी चार दोषींच्या अर्जावरील सुनावणी दरम्यान त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. 

जामियात गोळीबार करणाऱ्यास पैसे कोणी दिले? राहुल गांधींचा

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nirbhaya mother says convicts lawyer has challenged me saying that the convicts will never be executed