पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः दोषी विनय शर्माचे कारागृहात उपोषण सुरु

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी

दिल्लीतील बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चारही दोषींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्याच्या याचिकेवर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक दोषी विनय शर्माने उपोषण सुरु केले आहे. न्यायालयाने कारागृह अधिक्षकांना विनय शर्माची कायद्यानुसार देखभाल घेण्याचे निर्देश दिले आहेत.

इंदुरीकरांचे कीर्तन जनप्रबोधनासाठी, एका वाक्यानं वाईट ठरवू नकाः चंद्रकांत पाटील

दरम्यान, याप्रकरणातील आणखी एक दोषी मुकेशने न्यायाधीशांकडून नियुक्त न्यायमित्र वृंदा ग्रोवर यांनी आपली बाजू मांडू नये, असे म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने मुकेशच्या मागणीनुसार अधिवक्ता रवी काजी यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी नियुक्त केले आहे. तर तिहार कारागृह प्रशासनाने याप्रकरणी स्टेट्स अहवाल न्यायालयात दाखल केला आणि दोषी विनय शर्मा उपोषणा करत असल्याचे सांगितले. 

ट्रम्प यांचा दौरा संपल्यानंतर भिंती पाडणार काय?, शिवसेनेचा मोदींना सवाल

दोषींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्याच्या आजच्या याचिकेवरील सुनावणीबाबत आम्हाला आशा आहेत, असे सुनावणीच्या आधी निर्भयाची आई आशादेवी यांनी म्हटले. सुनावणीच्या अनेक तारखा आल्या आहेत. पण नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आलेले नाही. आम्हाला प्रत्येक सुनावणीवेळी आशा असते. आज काय होईल माहीत नाही पण मी आशा सोडलेली नाही.

CM उद्धव ठाकरेंची शिवभोजन केंद्राला भेट, लाभार्थ्यांशी साधला संवाद