पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः दोषी पवन कोर्टात, पोलिसांवर केला मारहाणीचा आरोप

पवन कुमार गुप्ता

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २० मार्चला फाशी दिली जाणार आहे. तत्पूर्वी दोषी पवन मंडोली कारागृहाच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी न्यायालयात पोहोचला आहे. या दोघांवर त्याने मारहाणीचा आरोप केला आहे. न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी करताना नोटीस जारी केली आहे. 

ज्योतिरादित्यांना जनता धडा शिकवेल, अशोक गेहलोत यांची टीका

निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषी पवनने दिल्लीतील मंडोली कारागृहातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात मारहाणीचा आरोप केला आहे. या मारहाणीत आपल्या डोक्याला दुखापत झाल्याचे त्याने म्हटले आहे. न्यायालयाने याप्रकरणी कारागृह व्यवस्थापनाला नोटीस जारी करत उत्तर मागितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १२ मार्चला होणार आहे. 

कोरोना बाधितांची ओळख उघड करु नका, प्रशासनाची पुन्हा विनंती

यापूर्वी निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी दोषींनी दिल्लीचे नायब राज्यपालांकडे धाव घेतली होती. दोषी विनय शर्माने आपले वकील ए पी सिंह यांच्या माध्यमातून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची मागणी केली होती. ए पी सिंह यांनी सीआरपीसीच्या कलम ४३२ आणि ४३३ अंतर्गत फाशीची शिक्षा निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

...म्हणून सचिनचा निर्णय विरुला खटकला!

दिल्लीच्या न्यायालयाने सर्व दोषींविरोधात चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता सर्व दोषींना फाशी ची शिक्षा देण्यात येणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Nirbhaya gang rape case convict Pawan moves Delhi court seeking FIR against policemen of Mandoli jail