पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: दोषींची याचिका फेटाळली, मागितली होती 'ही' कागदपत्रे

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा कायम

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी फाशी होऊ नये यासाठी नवीन युक्त्या शोधून काढत आहे. मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. या प्रकरणातील दोन दोषींनी दाखल केलेल्या याचिकेवर पतियाळा हाऊस कोर्टात शनिवारी सुनावणी झाली. यात दोषींच्या वकिलांनी तिहार तुरुंगातून दया याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार: संजय राऊत

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले की, तिहार कारागृह अधिकाऱ्यांनी दोषींच्या वकिलांनी मागितलेली सर्व संबंधित कागदपत्रे यापूर्वीच उपलब्ध करुन दिली आहेत. मात्र दोषी फाशीच्या शिक्षेला उशीर करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती अवलंबत आहेत.

कोणाला तरी वाचविण्यासाठी भीमा-कोरेगावचा तपास NIA

दरम्यान, दोषी विनय शर्माच्या वकीलांनी कोर्टाला सांगितले की, विनयला विष देण्यात आले होते आणि त्याला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु कोणताही वैद्यकीय अहवाल दिला जात नाही. यासंदर्भात कोर्टाने सांगितले की, पुढील कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता नाही. तसंच, तिहार तुरूंग ही कागदपत्रे सोपवत नसल्याचे सांगत पितयाळा हाऊस कोर्टाने दोषींच्या वकिलाची याचिका फेटाळली.

कोरोना विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत घेतला ४१ जणांचा बळी