पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्याय मिळण्यास उशिर होतोय याला 'आप' जबाबदार; निर्भयाच्या वडिलांचा आरोप

निर्भयाचे वडील

२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यास उशीर झाल्याबद्दल निर्भयाच्या वडिलांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारला जबाबदार धरले आहे. निर्भयाच्या वडिलांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे सांगितले की, मुलीला न्याय मिळण्यास उशीर होतोय याला आम आदमी पार्टी जबाबदार आहे, असा आरोप निर्भयाच्या वडिलांनी केला आहे. 

संजय राऊतांना पदावरुन दूर करा; संभाजी भिडेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी

निर्भयाच्या वडिलांनी या मुलाखतीमध्ये असे सांगितले की, 'सर्वोच्च न्यायालयाने पुनरावलोकन याचिका फेटाळल्यानंतर तुरूंग प्रशासनाला नोटीस देणे आणि दोषींना एका आठवड्यात दया याचिका दाखल करण्यास सांगणे हे राज्य सरकारचे काम आहे. दिल्ली सरकार या प्रकरणात शांत बसले आहे. इतकेच नाही तर जेव्हा कोर्टात आम्ही हे प्रकरण लढत होतो तेव्हा दिल्ली सरकारने दोषींना मदत करण्यासाठी वकील पाठविला. पुढे त्यांनी असे सांगितले की, कोर्टात येऊन दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी जेलच्या नियमावलीबद्दल सांगितले ज्यामुळे दोषींना मदत मिळाली, असे त्यांनी सांगितले. 

निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली