पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोर्टाच्या निर्णयावर खुश; निर्भयाच्या वडिलांची प्रतिक्रिया

निर्भयाचे वडील

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता दोषींना फाशी देण्यात येणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर निर्भयांच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

निर्भयाच्या दोषींना गय नाही, २२ जानेवारीला ७ वाजता होणार फाशी

कोर्टाच्या निर्णयानंतर निर्भयाच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मी कोर्टाच्या निर्णयावर खुश आहे. सर्व दोषींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे अशा प्रकराचे गुन्हे करणाऱ्यांच्या मनामध्ये भिती निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

'फ्री काश्मीर'चे पोस्टर का झळकावले, मेहक प्रभूने केला खुलासा

सात वर्षापूर्वी म्हणजे १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. सहा पैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोडण्यात आले होते. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी रामसिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. तर या प्रकरणातील उर्वरीत चारही दोषींना आता फाशी देण्यात येणार आहे.

कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेवेळी चेंगराचेंगरी; ३५ जण ठार