पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: गृहमंत्रालयाने दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतीकडे पाठवली

मुकेश सिंह

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची दया याचिका केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. त्यामुळे मुकेशच्या दया याचिकेवर अंतिम निर्णय राष्ट्रपती रामनाथ कोविंद घेणार आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवली असून या याचिकेला नामंजूर करण्याची शिफारस केली आहे.

मुलीच्या लग्नाची चिंता; पुण्यात डीएसके ठेवीदाराची आतमहत्या 

निर्भया प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या चारही दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार होती. मात्र फाशीची शिक्षा माफ व्हावी यासाठी दोषींकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा मार्ग आहे. याप्रकरणातील दोषी मुकेशची दया याचिका गृहमंत्रालयाने गुरुवारी रात्री राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. 

जीसॅट-३० उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणार

दरम्यान, दिल्लीच्या उपराज्यपालांनी गुरुवारी दोषी मुकेश याची दया याचिका फेटाळून लावण्याची मागणी गृहमंत्रालयाकडे केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगिले होते की, गृहमंत्रालयाला उपराज्यपालांकडून दया याचिका मिळाली आहे. ज्यामध्ये त्यांनी या याचिकेला फेटाळून नामंजूर करण्यासाठी मागणी केली आहे. 

मुंबईत जानेवारीत सर्वाधिक थंडी, दशकातील नवा विक्रम

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nirbhaya case ministry of home affairs had sent the mercy petition of convict mukesh to rashtrapati bhavan