पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भया प्रकरणातील दोषी

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी रात्री ही दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवली होती. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवत या याचिकेला नामंजूर करण्याची शिफारस केली होती.

मुलीच्या लग्नाची चिंता; पुण्यात डीएसके ठेवीदाराची आत्महत्या

निर्भया प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या चारही दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार होती. मात्र फाशीची शिक्षा माफ व्हावी यासाठी दोषींकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा मार्ग असतो. दोषी मुकेशने फाशीची शिक्षा माफ व्हावी यासाठी दया याचिका दाखल केली होती. मात्र राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळली आहे. 

जीसॅट-३० उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणार

दरम्यान, सात वर्षापूर्वी म्हणजे १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. सहा पैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोडण्यात आले होते. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी रामसिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. तर या प्रकरणातील उर्वरीत चारही दोषींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींची सुटका