पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भयाच्या दोषींना मेरठचा पवन जल्लाद देणार फाशी

पवन जल्लाद

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. दोषींना फासावर लटकवण्यासाठी मेरठ येथील पवन जल्लाद याचे नाव सर्वात वरती आहे. तसंच, पवन जल्लादच दोषींना फाशी देणार असल्याचे नक्की झाले आहे. कारण तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी आम्ही मेरठ येथून जल्लादची सेवा घेऊ, असे देखील स्पष्ट केले आहे.

निर्भयाच्या दोषींना गय नाही, २२ जानेवारीला ७ वाजता होणार फाशी

दरम्यान, तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी जल्लाद मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश कारागृहाला पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे आज पतियाला हाऊस कोर्टाने दिलेला निर्णय, फाशी देण्याची तारीख आणि वेळ याची माहिती देण्यात आली आहे. तसंच आम्ही मेरठ येथून जल्लादची सेवा घेऊ, असे देखील तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

अखेर माझ्या मुलीला न्याय मिळाला; निर्भयाची आई

पवन जल्लाद मेरठ येथे राहतो. पवन जल्लादचे वडील मम्मू सिंह, आजोबा कल्लू सिंह आणि पंजोबा लक्ष्मण सिंह हे सुध्दा आरोपींना फाशी द्यायचे. पवन देशातील एकमेव असा जल्लाद आहे. जो आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत आहे. पवन सिंहचे आजोबा कल्लू सिंह यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशी दिली होती. 

निर्भया केस : १६ डिसेंबर २०१२ पासून आतापर्यंत काय काय झाले?