पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीसंदर्भात दिल्ली हायकोर्ट आज निकाल देणार

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा कायम

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील चार दोषींच्या फाशीच्या स्थगितीसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निकालाला केंद्र तसेच दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शनिवारी (१ फेब्रुवारी) आणि रविवारी (२ फेब्रुवारी) यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारच्या वकिलांसह दोषींच्या वकिलांनी  युक्तिवाद झाला. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सुरेश कुरमा कैत यांनी आपला आदेश राखून ठेवला होता. 

'...तर शरद पवारांच्या रुपात मराठी माणूस पंतप्रधान होईल'

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार यांच्या फाशीला दिल्लीतील पटियाला न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले होते. या स्थगितीला आव्हान देणारी याचिका केंद्र आणि दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर लवकरात लवकर निकाल द्यावा, अशी मागणी निर्भयाच्या आई-वडिलांनी केली होती.  

मोदींनी प्रसिद्धीसाठी ५ हजार २०० कोटी उधळले: प्रियांका गांधी

दोषींकडे कायद्यासंदर्भातील पर्याय खुले असताना फाशीची घाई करु नये, असे सांगत  वकिलांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात पटियाला न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३१ जानेवारीला न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत फाशीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणातील दोषी  मुकेश आणि विनय यांची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. पवन सिंहने अद्याप दया याचिका दाखल केलेली नाही. अक्षयने १ फेब्रुवारीला दया याचिका दाखल केली असून यावर अद्याप निर्णय आलेला नाही. सर्वाच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेल्या निकालात दिल्ली उच्च न्यायालय आणि दिल्लीतील अन्य न्यायालयाने दोषींना दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिले होते.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Nirbhaya case Delhi High Court order Today on Centre plea against stay on Nirbhaya convicts hanging