पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः दोषी पवनची याचिका कोर्टाने फेटाळली; वकिलाला दंड

निर्भया प्रकरण

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन कुमारची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. निर्भया प्रकरण घडले त्यावेळी मी अल्पवयीन होतो असा दावा करत पवन कुमारने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र पवनची याचिका कोर्टाने फेटाळून लावली. तर, पवनचे वकील ए. पी सिंग यांना कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

भाजपला पर्याय हवाय पण देशात राहणारा, शरद पवारांचा राहुल गांधींना टोला

पवनने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत घटेनेच्या वेळी मी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. तसंच, त्याने याचिकेत असे म्हटले होते की, घटनेनंतर ऑसिफिकेशन टेस्ट झाली नव्हती आणि या गोष्टीचा फायदा मिळायला हवा. तसंच बाल न्याय कायद्यांतर्गत माझ्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी त्याने याचिकेत केली होती. निर्भया प्रकरणातील दोषी पवनच्या वयाबाबत बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी त्याचे वकील ए. पी सिंह यांच्याविरोधात दिल्ली बार काऊंसिलने कारवाई करावी, असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

दिल्ली आंदोलन: १८ मेट्रो स्टेशन बंद; ५ तासांनंतर मोबाईल सेवा सुरु

१६ डिसेंबर २०१२ साली दिल्लीमध्ये निर्भयावर चालत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला चालत्या बसमधून फेकून देण्यात आले होते. दरम्यान, उपचारावेळी निर्भयाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ६ ही दोषींना पोलिसांनी अटक केली होती. यामधील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले होते. तर दुसऱ्या आरोपीने तिहार कारागृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. तर इतर ४ दोषींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

प्लीज, सनाला यापासून दूर ठेवा; सौरव गांगुलींची विनंती