पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण : चारही दोषींना २० मार्चला पहाटे फासावर लटकवण्याचे आदेश

निर्भया प्रकरणातील दोषी

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यासंदर्भातील नवे आदेश दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने दिले आहेत. तीन वेळा फाशीला स्थगिती मिळाल्यानंतर नव्या आदेशानुसार, दोषींना २० मार्च रोजी सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी फासावर लटकवण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार दोषींपैकी पवन कुमार गुप्ताची दया यचिका फेटाळून लावली. यापूर्वी राष्ट्रपतींनी या प्रकरणातील तिघांची दया याचिका फेटाळली होती. पवनची याचिका फेटाळल्यानंतर दोषींसमोरील बचावाचे सर्व कायदेशीर पर्याय  संपले आहेत. त्यामुळ पटियाला कोर्टाने यावेळी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी निश्चित मानली जात आहे. 

पवन कुमार गुप्ताची दया याचिका फेटाळल्यानंतर निर्भयाच्या कुटुंबियांनी दिल्लीतील पटियाला हाउस न्यायालयाने दोषींना फाशी देण्यासंदर्भात नव्याने याचिका दाखल करण्यात आली होती. दोषींची दया याचिका फेटाळल्यानंतर फाशी देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी असावा,अशी कारागृह नियमावलीत तरतुद आहे. या तरतुद लक्षात घेत न्यायालयाने २० मार्चला फाशी देण्याचे आदेश काढले आहेत. निर्भयाची आई आशा देवी यांनी आपल्या लेकीला यावेळी न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त केली आहे. दोषींसमोरील सर्व कायदेशीर मार्ग संपले असून यावेळी त्यांना फाशी निश्चित होईल, असे त्या म्हणाल्या.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Nirbhaya Case Delhi Court issues a fresh death warrant against the four convicts They are to be hanged at 5 30 am on March 20 2020