पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: दोषी विनयने सुप्रीम कोर्टात दाखल केली क्युरेटिव्ह पिटिशन

सुप्रीम कोर्ट

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका दोषीने फाशीच्या शिक्षेविरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे. निर्भया प्रकरणातील दोषी विनय कुमार शर्माने सुप्रीम कोर्टात निर्णय सुधार याचिका दाखल केली आहे. दरम्यान, दिल्लीच्या पतियाला हाऊस कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. चारही दोषींना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे.

अडचणींवर मात करत आम्ही सरकार स्थापन केले: मुख्यमंत्री

दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने ७ जानेवारी रोजी निर्भयाच्या चारही दोषींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले. निर्भयाच्या आईने पतियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करत निर्भयाच्या दोषींचे डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. त्यावर पतियाला हाऊस कोर्टाने सुनावणी करत दोषींना २२ जानेवारीला फाशी देण्याचे जाहीर केले. दरम्यान, फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी यासाठी विनय कुमारने सुप्रीम कोर्टात निर्णय सुधार याचिका दाखल केली आहे. 

देश सध्या कठीण परिस्थितीतून जातोय - सरन्यायाधीश

दिल्लीमध्ये सात वर्षापूर्वी म्हणजे १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. त्यानंतर निर्भयाला चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिले होते.  याप्रकरणी पोलिसांनी विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता, अक्षय कुमार सिंह, राम सिंह आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. 

मुंबई पोलिसांना मोठे यश, गँगस्टर एजाज लकडावालाला बेड्या

निर्भया प्रकरणी अटक केलेल्या सहा पैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी राम सिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. तर उर्वरीत दोषी विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्त आणि अक्षय कुमार सिंह यांना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे.

काही विचारवंत सापासारखे विषारी - उमा भारती