पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः दोषी पवनही गेला कोर्टात, फाशीला स्थगितीची मागणी

निर्भया प्रकरणः दोषी पवनही गेला कोर्टात, फाशीला स्थगितीची मागणी

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याच्या प्रकरणाला शनिवारी आणखी एक नवे वळण लागले आहे. चार दोषींपैकी एक पवनकुमार गुप्तानेही फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीवरुन दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयात सुधारात्कमक याचिका प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. तर दुसरा दोषी अक्षय आधीच डेथ वॉरंटला स्थगिती देण्याची मागणी घेऊन न्यायालयात पोहोचला आहे. 

निर्भया प्रकरणः पुन्हा पेच, आता दोषी अक्षयने दाखल केली नवीन दया याचिका

दोषी अक्षयच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने तिहार कारागृहाच्या अधिकाऱ्यांना एक अहवाल देण्याचे निर्देश देताना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारचा दिवस निश्चित केला आहे. नवीन याचिकेत अक्षयने त्याच्या पहिल्या याचिकेत सर्व तथ्ये नसताना ती फेटाळण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व चारही दोषींना तीन मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 

दोषी पवनकुमार गुप्ताच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. पवनच्या याचिकेवर न्या. एन व्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ सुनावणी करेल. पवनने आपल्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्याची मागणी केली आहे.

दिल्ली हिंसाचारः जवानाचं जळलेलं घर उभारण्यासाठी BSFचा पुढाकार