पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Nirbhaya Case: या कारणास्तव दोषीने केली दया याचिका परत घेण्याची मागणी

निर्भया बलात्कार प्रकरणातील दया याचिकेची फाईल राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली आहे.

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्माने गृहमंत्रालयाद्वारे राष्ट्रपतींकडे केलेली दयेची याचिका परत घेण्याची मागणी केली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. गृहमंत्रालयाने संबंधी आरोपीच्या दया याचिकेसंदर्भातील फाईल राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. लवकरात लवकर ही याचिका परत घ्यावी, असे विनय शर्माने म्हटले आहे. 

हैदराबाद एनकाऊंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

गृहमंत्रालयाद्वारे राष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या दया याचिकेवर माझे हस्ताक्षर नाही. तसेच माझी त्याला अधिकृतरित्या मान्यता नाही, असा दावा करत विनय शर्माने दया याचिका मागे घ्यावी असे म्हटले आहे. गृहमंत्रालयाने शुक्रवारी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माची दया याचिकेची फाईल राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवली होती. या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा हे सांगताना मागणी फेटाळून लावावी, असा उल्लेखही गृहमंत्रालयाकडून करण्यात आला होता.  

न्याय बदल्याच्या भावनेतून दिला जाऊ नये, CJI बोबडे यांचे सूचक वक्तव्य

१६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात दोषी ठरलेल्या  २३ वर्षीय विनय शर्माला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात कोणतीही दया दाखवू नये, अशी भावना देशातील जनसामान्यामध्येही पाहायला मिळत आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Nirbhaya case 2012 Nirbhaya gang rape convict Vinay Sharma seeks immediate withdrawal of his mercy petition