पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला; २२ ऑगस्टपर्यंत कोठडीत वाढ

नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला मुख्य सुत्रधार नीरव मोदीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. लंडन येथील न्यायालयामध्ये नीरव मोदी याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र या प्रकरणातील पुराव्यांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत नीरव मोदीची कोठडी २२ ऑगस्टपर्यंत वाढवली. या आधी न्यायालयाने नीरव मोदीची कोठडी २५ जुलैपर्यंत वाढवली होती.

धोनी काश्मीर खोऱ्यात पेट्रोलिंग अन् गार्डची ड्युटी करणार

४८ वर्षीय नीरव मोदी याला पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. अटक करुन त्याची रवानगी लंडन येथील वड्सवर्थ कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर नीरव मोदीने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. याआधी युकेच्या उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. नीरव मोदीने जामीनासाठी पाचव्यांदा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने आज सुध्दा त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 

टीक-टॉक व्हिडीओमुळे महिला पोलिसाचं निलंबन

नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँक घोटाळा समोर आला. तेव्हा नीरव मोदी परदेशात फरार झाला. त्यानंतर मार्चमध्ये त्याला लंडन येथे अटक करण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत नीरव मोदी याचे देशातील कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसंच नीरव मोदी आणि त्याची बहीण पूर्वी मोदी यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. 

भारतीय वंशाच्या प्रिती पटेल इंग्लंडच्या गृहमंत्री