लंडनच्या न्यायालयाने हिरे व्यापारी नीरव मोदीला मोठा झटका दिला आहे. रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसने नीरव मोदीला जामीन देण्यास नकार दिला आहे.
This was #NiravModi's fourth bail application at the UK court which was refused. https://t.co/Jxv8rSK8Q0
— ANI (@ANI) June 12, 2019
यापूर्वी नीरव मोदीच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली होती. नीरव मोदीला १९ मार्च रोजी १३ हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली स्कॉटलँड यार्डमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्या प्रत्यर्पणासाठी भारतीय तपास यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहेत. जामीन मिळाल्यानंतर नीरव मोदी न्यायालयासमोर पुन्हा समर्पण करणास नाही, असे न्यायालयाला वाटते, असे न्या. इंग्रिड सिमलर यांनी म्हटले.
नीरव मोदीने खालच्या न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पंजाब नॅशनल बँकेला २ अब्ज डॉलरला फसवल्याप्रकरणी आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी आपल्याला भारताकडे सोपवले जाऊ नये यासाठी तो प्रयत्न करत आहे.
नीरव मोदीच्या रोल्स रॉयस कारची १.७० कोटीत विक्री
दरम्यान, वेस्टमिनिस्टर न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज तीन वेळा फेटाळला आहे.