पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लंडन कोर्टाने नीरव मोदीची कोठडी पुन्हा १९ सप्टेंबरपर्यंत वाढवली

नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कोठडीत गुरुवारी १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात आहे. वेस्टमिंस्टर सत्र न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून याबाबत सुनावणी केली. यापूर्वी नीरव मोदीने जामीनासाठी पाचव्यांदा केलेला अर्ज फेटाळत न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत त्याच्या कोठडीत वाढ केली होती.  

४८ वर्षीय नीरव मोदी याला पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. अटक करुन त्याची रवानगी लंडन येथील वड्सवर्थ कारागृहात करण्यात आली आहे.नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप आहे.

राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनीच्या पॅरोलमध्ये ३ आठवड्यांनी 

फेब्रुवारी २०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँक घोटाळा समोर आला. तेव्हा नीरव मोदी परदेशात फरार झाला. त्यानंतर मार्चमध्ये त्याला लंडन येथे अटक करण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत नीरव मोदी याचे देशातील कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.