पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएनबी घोटाळा: नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित

नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीला 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.

 

मध्य प्रदेशमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात; ९ ठार तर २७ जखमी

पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपये घेऊन परदेशात फरार झालेल्या हिरेव्यापारी नीरव मोदीविरोधात विशेष पीएमएलए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. वारंवार समन्स बजावून देखील नीरव मोदी कोर्टाच्या कार्यवाहीला सामोरा जात नसल्याने त्याला 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषीत करण्यात यावे, अशी मागणी ईडीने अर्जाद्वारे केली होती. 

बॉयफ्रेंडशी लग्न होऊन ९ दिवस झाले असतानाच तरुणीचा संशयास्पद

ईडीने केलेला अर्ज विशेष पीएमएलए कोर्टाने मान्य करत नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले. त्यामुळे नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्याचा तपास यंत्रणेचा मार्ग मोकळा झाला आहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. पंजाब नॅशनल बँकचे १३ हजार कोटी रुपये घेऊन नीरव मोदी परदेशात फरार झाला आहे.  

सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर