एका मशिदीत लपून बसलेल्या ९ पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी शोधून काढले आहे. हे सर्वजण दिल्लीतील निजामुद्दीन जमातमध्ये सहभागी झाल्यानंतर धर्म प्रचारासाठी निघाले होते. या ९ पाकिस्तानी नागरिकांबरोबर आग्रा येथील १० लोकांनाही पोलिसांनी या मशिदीतून अटक केली. या सर्वांना १४ दिवसांच्या क्वारंटाइनसाठी शिबिरात पाठवण्यात आले आहे.
देशातील ४०६७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७६ टक्के पुरुष
या पाकिस्तानी नागरिकांना भारत-नेपाळ सीमेजवळ मोरंगच्या सुनसरी नगर पालिकेत येणाऱ्या एका मशिदीतून नेपाळ पोलिसांनी अटक केली. या लोकांची चौकशी केल्यानंतर ९ पाकिस्तानी इस्लामच्या प्रचारासाठी नेपाळला आल्याचे सांगितले. त्यांच्याबरोबर आग्राच्या १० लोकांचाही समावेश होता. हे १९ लोक मशिदीत लपले होते. या १९ लोकांना पोलिसांना न सांगता मशिदीत जागा देण्याच्या आरोपाखाली एका स्थानिक युवकालाही अटक करण्यात आली आहे.
कोरोना: पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात
नेपाळ पोलिसचे डीएसपी सागर थापा म्हणाले की, पाकिस्तानी नागरिक जिहाद, साहिद, स्लॅम, खान, अली, मोस्टर, उल्लाह खान, इम्तियाज, जामिन यांच्याबरोबर १० आग्र्याला राहणाऱ्या भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सर्वांना अटक केली असून १४ दिवसांसाठी क्वारंटाइनसाठी पाठवण्यात आले आहे.
देशातील काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यातः एम्स संचालक
दरम्यान, नेपाळमध्ये आलेले सुमारे २५६ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. परंतु, त्यांचे लोकेशन मिळालेले नाही.