पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे आणखी ९ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १४४ दगावले

रुग्णालयात दाखल असलेली मुले

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि लगतच्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे लहान मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने सुरू आहेत. मेंदूज्वरामुळे मंगळवारी आणखी ९ मुलांना आपले प्राण गमवावे लागले. या आजारामुळे मृत पावलेल्या मुलांची संख्या १४४ झाली आहे. या आजारामुळे बिहारमधील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुझफ्फरपूरमधील एमकेएमसीएच रुग्णालयात पाच, समस्तीपूर सदर रुग्णालयात दोन, बेतिया मेडिकल कॉलेज आणि मोतिहारी सदर रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मेंदूज्वरामुळे मंगळवारी मृत्यू झाला. त्याचवेळी एमकेएमसीएच आणि केजरीवाल रुग्णालयामध्ये मंगळवारी ३९ मुलांना नव्याने दाखल करण्यात आले. गेल्या १८ दिवसांत मेंदूज्वराचे एकूण ४२९ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. यापैकी मुझफ्फरपूरमधील १४४ मुलांचा मृत्यू झाला आहे.

बिहार सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार या आजारामळे आतापर्यंत ९० मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. बिहारमधील आरोग्य विभागातील डॉक्टरांनी या आजाराबद्दल पाटण्यातील एम्स आणि एनसीडीसी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक माहिती घेतली. उपचारांमध्ये काय बदल केले पाहिजेत, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, बिहारमधील परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यांनी दिल्लीमध्येही वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन पुढील उपाययोजना काय करायला हव्यात, याबद्दल माहिती घेतली.