पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा हल्लाः NIAला मोठे यश, सुसाइड बॉम्बरला मदत करणाऱ्याला अटक

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाकिर बशीर

मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश आले आहे. एनआयने शुक्रवारी आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दारला मदत करणारा शाकिर बशीरला अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाकिर बशीरने आत्मघातकी हल्लेखोर दारला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. 

अर्थव्यवस्थेत सुधारणा, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकासदर ४.७ टक्के

मागील वर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे २५०० सीआरपीएफ जवानांना ७८ बसमधून नेण्यात येत होते. तेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला समोरुन येत असलेल्या एका कराने धडक दिली होती. त्यावेळी स्फोट झाला होता. हा हल्ला आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दारने केला होता. 

एवढं खोटं का बोलता?; गृहमंत्र्यांचा काँग्रेस, ममता बॅनर्जींना सवाल