पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेच्या व्हिसा नियमात बदल, अनेक भारतीयांना फटका बसणार

डोनाल्ड ट्रम्प

स्वतःच्या आरोग्याचा खर्च उचलू न शकणाऱ्या किंवा आरोग्याचा विमा नसलेल्या भारतीय नागरिकांना येत्या नोव्हेंबरपासून अमेरिका व्हिसा नाकारला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने या संदर्भातील निर्णय घेतला असून, अमेरिकेवरील स्थलांतरितांचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हणण्यात आले आहे.

आदित्यच्या उमेदवारीनंतर उद्धव ठाकरे यांनी मांडली महत्त्वाची भूमिका

अमेरिकेत नव्याने जाण्यासाठी जे व्हिसा मागतील, त्यांच्यासाठी हा नियम लागू असणार आहे. जे स्थलांतरित आधीपासून अमेरिकेत आहेत त्यांना हा नियम तूर्त लागू होणार नाही. त्याचबरोबर अमेरिकेत स्थायिक असलेल्या नागरिकांच्या भारतातून येणाऱ्या नातेवाईकांसाठी हा नियम विशेषत्वाने लागू होणार आहे. 

अमेरिकी प्रशासनाच्या या नव्या नियमामुळे सुमारे २३ हजार भारतीय नागरिकांच्या व्हिसा प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे डोग रँड यांनी म्हटले आहे. रँड हे आधीच्या ओबामा प्रशासनात इमिग्रेशन विभागाचे अधिकारी होती. भारतातून दरवर्षी ३५ हजार नागरिक अमेरिकेतील रहिवाशांचे नातेवाईक या आधारावर तिथे जात असतात. येत्या ३ नोव्हेंबरपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

भाजपचे घाटकोपर पूर्वतील उमेदवार पराग शहा ५०० कोटींचे धनी

या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, या देशात येणाऱ्या स्थलांतरितांच्या बोज्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था कोलमडली नाही पाहिजे. अमेरिकेतील नागरिक भले मोठे कर भरतात. त्यामुळे त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत.