पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाहतूक नियमः गुजरातने ९० टक्क्यांपर्यंत कमी केली दंडाची रक्कम

संग्रहित छायाचित्र

केंद्र सरकारकडून वाहन-वाहतूक ऍक्टमध्ये दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या १० दिवसांत गुजरात सरकारने मंगळवारी दंडाच्या रकमेत मोठी कपात केली आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर केंद्राने वाढवलेल्या दंडाची रक्कम राज्य सरकारने २५ ते ९० टक्क्यांची कपात केली आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यासाठी मानवीय अधिकाराचे कारण सांगितले आहे. गुजरातच्या निर्णयानंतर आता इतर राज्येही दंडाच्या रकमेत कपात करण्याची शक्यता आहे. नवीन वाहतूक ऍक्टमध्ये राज्यांना दंडाची रक्कम कपात करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

ओव्हरलोडिंगमुळे ट्रक चालकाला तब्बल १,४१,७०० रुपयांचा दंड

दि. १६ सप्टेंबरपासून गुजरातमध्ये नव्या दंडाची रक्कम लागू होईल. दरम्यान, सरकारने मद्य प्राशन करुन वाहन चालवणे आणि सिग्नल न पाळण्यामुळे घेण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कोणताच बदल केलेला नाही. आतापर्यंत या नव्या नियमांचा काँग्रेसशासित राज्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाबशिवाय गुजरातमध्ये लागू झाला नव्हता. कर्नाटक सरकारनेही जर दुसऱ्या राज्यांनी दंडाची रक्कम कमी केली तर विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेली पश्चिम बंगाल आणि काँग्रेस शासित मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या बिगर-भाजप शासित राज्यांनी आधीच दंडाच्या रकमेत वाढ केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. .

ट्रॅफिक पोलिसांनी वाद घातल्याने सॉफ्टवेअर तंत्रज्ञाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गुजरातमध्ये हेल्मेट न घातल्यास १००० ऐवजी ५०० रुपये दंड होईल. सीट बेल्ट न लावल्यास १००० ऐवजी ५०० रुपये दंड होईल. विनापरवाना वाहन चालवल्यास गुजरातेत ५००० ऐवजी दुचाकीसाठी दोन हजार, अन्य वाहनांसाठी ३००० रुपये दंड लागेल. ट्रिपल सीटसाठी १००० ऐवजी गुजरातमध्ये फक्त १०० रुपये दंड लागेल. अतिवेगासाठी २००० ऐवजी १५०० रुपये दंड द्यावा लागेल. लायसन्स, विमा, पीयूसी, आरसी नसल्यास प्रथम ५०० आणि दुसऱ्या वेळी १००० रुपये दंड आकारण्यात येईल.