पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरातही भाविकांसाठी आता ड्रेसकोड

वाराणसी

वाराणसीमधील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. विशेषतः ज्यांना गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शन घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी ड्रेस कोड पाळणे बंधनकारक आहे. 

JNU तील त्या दिवशीचा सर्व डेटा जपून ठेवा, हायकोर्टाचे ऍपल, गुगलला आदेश

मंदिरातील गाभाऱ्यात ज्यांना ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घ्यायचे आहे. त्यांना आता धोतर आणि कुर्ता घालणे बंधनकारक आहे. ज्या भाविकांनी हे कपडे घातले आहेत. त्यांनाच गाभाऱ्यात जाऊन ज्योतिर्लिंगाला स्पर्श करता येईल. जे भाविक पँट, जीन्स, शर्ट आणि टी शर्ट घालून येतील त्यांना मंदिरात लांबूनच दर्शन घ्यावे लागेल. काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि धर्मार्थ कार्य मंत्री डॉ. नीळकंठ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी सर्व उपस्थितांकडून त्यांच्या सूचना आणि सल्ले मागितले. जास्तीत जास्त भाविकांना ज्योतिर्लिंगाचे स्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी काय करता येईल, यासाठीही सूचना मागविण्यात आल्या.

टॅक्सी चालकावर समलिंगी बलात्कार; आरपीएफ पोलिसाला अटक

मंदिरात पूजा करणाऱ्या गुरुजींसाठीही ड्रेसकोड असावा, अशीही सूचना परिषदेतील सदस्यांनी यावेळी केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:New rule at Kashi Vishwanath temple in Varanasi devotees in jeans t shirts wont be able to touch the deity