पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नव्या संसद भवनात १३५० खासदारांसाठी आसन व्यवस्था

नवे संसद भवन त्रिकोणी असेल.

नव्या संसद भवनात लोकसभेतील सेंट्रल हॉल इतका मोठा असेल की भविष्यात जरी खासदारांची संख्या वाढली तर सर्व खासदारांची बसण्याची सोय होईल. सरकारकडून प्रस्तावित नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या नवीन इमारतीत ९०० आसने असतील. तर संयुक्त अधिवेशनादरम्यान १३५० खासदार आरामात बसू शकतील. सरकारने सेंट्रल व्हिस्टाला पुनर्विकसित करण्याच्या योजनेस मंजुरी दिली आहे. यासाठी २०२४ ची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

नवे संसद भवन त्रिकोणी असेल. भविष्यात लोकसभेच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या नवीन इमारतीच्या आत आसनांची संख्या वाढवली जाणार आहे. नव्या लोकसभेत दोन आसनांचे बाक असतील. यामध्ये खासदार आरामात एकटे बसू शकतील. तर संयुक्त अधिवेशन काळात यावर तीन खासदार बसू शकतील. अशा पद्धतीने एकूण १३५० खासदारांची आसन व्यवस्था असेल.

जगातल्या सर्वाधिक कमी उंचीच्या व्यक्तीचं २७ व्या वर्षी निधन

तीन टप्प्यात ही योजना पूर्णत्त्वास नेली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत तीन किमीच्या टप्प्यात असलेल्या 'सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राला' २०२१ पर्यंत नवे रुप दिले जाणार आहे. तर भविष्यातील आवश्यकतेप्रमाणे संसद भवनाच्या नव्या इमारतीची निर्मिती २०२२ पर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यात सर्व केंद्र मंत्रालयांना एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी प्रस्तावित समग्र केंद्रीय सचिवालयाची निर्मिती २०२४ पर्यंत करण्याचे लक्ष्य आहे.

नव्या योजनेनुसार नवीन सचिवालयात १० भवन उभारले जातील. संसद भवनाच्या अगदी जवळ नवी संसद उभारली जाणार आहे. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे संग्रहालयात रुपांतर केले जाईल.

यूपीमध्ये महिलेला खाटेला बांधून जाळले; बलात्कार झाल्याचा संशय

पंतप्रधान निवास आणि कार्यालयातही बदल दिसून येतील. झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे सुमारे ९० एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. या जागेचा उपयोग साऊथ ब्लॉकच्या मागे पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान आणि कार्यालय बांधण्यात येईल. हे दोन्ही अशा पद्धतीने उभारले जाईल की, पंतप्रधान आपल्या निवासस्थानातून पायी कार्यालयात जाऊ शकतील. त्याचबरोबर उपराष्ट्रपतींचे निवासस्थानही बदलले जाईल. पंतप्रधानांच्या घरासमोर त्यांचे निवासस्थान असेल.  

रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनाच्या समोरील नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक येथूनच पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयासारखे महत्त्वाची कार्यालये संचलित होतात. साऊथ ब्लॉकमध्ये होणाऱ्या संग्रहालयात १८५७ पूर्वीच्या ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे. तर नॉर्थ ब्लॉकमध्ये १८५७ ते १९४७ पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाच्या आठवणी ताज्या केल्या जातील. 

'सावरकरांना 'भारतरत्न' देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा'

सध्या साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि विदेश मंत्रालय तसेच नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय आहे.

मंत्रालयाला सोपवण्यात आलेल्या सुरुवातीच्या डिझाईननुसार संपूर्ण केंद्रीय सचिवालयासाठी राजपथाच्या दोन्ही बाजूला १० भव्य ८ मजली इमारतींमध्ये सर्व मंत्रालये स्थानांतरित केले जाणार आहे. लुटियन परिसरात विविध मंत्रालयांचे २५ ते ३२ हजार केंद्रीय कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधान निवासस्थानाच्या जवळच नॉर्थ ब्लॉक बांधण्याचा प्रस्ताव आहे.

निर्भया प्रकरणातील दोषींना माफ करा, इंदिरा जयसिंह यांचे आवाहन; आशादेवी भडकल्या

उल्लेखनीय म्हणजे प्रस्तावित कामास मुर्त रुप देण्यासाठी दिल्ली विकास प्राधिकरणाने सेंट्रल व्हिस्टा परिसराला सुमारे १०० एकर जमिनीचे भू उपयोग बदलण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अंतर्गत ९.५ एकरमध्ये संसद भवनाची नवीन इमारतीसाठी, १५ एकर जमीन निवासी उपयोगासाठी आणि ७६ एकर जमीन कार्यालय उपयोगासाठी निश्चित करण्यात आली आहे.