पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून इन्कम टॅक्ससाठी अर्थमंत्र्यांनी आणली नवी पद्धत

अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांचं लक्ष

वैयक्तिक प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) भरण्यासाठी शनिवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात नवी पद्धत आणण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये प्राप्तिकरदात्यांना कमी कर द्यावा लागणार आहे. पण त्याचबरोबर त्यांना आपल्या उत्पन्नात कोणतीही प्रमाणित वजावट दाखवता येणार नाही. ज्यांना आपल्या उत्पन्नात प्रमाणित वजावट दाखवायची आहे. त्यांना पूर्वीच्या पद्धतीने आणि त्याच दराने प्राप्तिकर भरण्याची सुविधाही ठेवण्यात आली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दैनिक 'हिंदुस्तान'शी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा निर्णय घेण्यामागील अर्थ मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली.

कोरोनाशी लढण्यासाठी चीनने ९ दिवसांत बांधले नवे रुग्णालय

त्या म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून अर्थसंकल्प सादर करताना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांसाठी प्राप्तिकरात सूट दिली जात होती. ही यादी वाढतच चालली होती. यामुळे एकीकडे प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांचे काम वाढत होते. तर दुसरीकडे सामान्य करदात्यांना चार्टर्ड अकाऊंटंटकडे जाऊन त्यांच्याकडून आपले विवरणपत्र भरून घ्यावे लागत होते. यासाठी खूप मोठे शुल्क त्यांना चार्टर्ड अकाऊंटंटना द्यावे लागायचे. वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक केल्यास प्राप्तिकरात सूट मिळते. पण त्यामुळे प्रत्यक्षात देशातील नागरिकांची कर देण्याची क्षमता नक्की किती आहे, हे समजू शकत नव्हते. त्यामुळेच केंद्र सरकारने नव्या व्यवस्थेत प्राप्तिकर बचतीच्या १२० पर्यांयांपैकी ७० हटविले आहेत. 

आपल्याला बचत करायची आहे की नाही याचा निर्णय आता नागरिकांना घ्यायचा आहे. केवळ प्राप्तिकर वाचविण्यासाठी करदात्यांना ओढूनताणून बचत करायला लागू नये, असे सरकारचे म्हणणे आहे, असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेवर जाण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत

नवी पद्धत आणताना लोकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये. त्याचबरोबर त्यांना जर जुनी पद्धत योग्य वाटत असेल तर त्यानुसार प्राप्तिकर भरता यावा, यासाठीच आम्ही जुनी पद्धतही कायम ठेवली आहे, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:new income tax slab to tax exemption read here budget 2020 finance minister nirmala sitharaman