पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचार पद्धतीत मोठा बदल, नव्या सूचना जारी

आतापर्यंत कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचे निर्देश होते.

कोरोना विषाणू संक्रमणाची अत्यंत सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे दिसण्यापूर्वीची स्थिती असलेल्या रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने घरातच विलगीकरण पद्धतीने ठेवण्यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या सूचनामध्ये बदल करून नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाचे पोलिस घरी थांबले तरी चालेल - आयुक्त

आतापर्यंत कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचे निर्देश होते. जर लक्षणे मध्यम असतील तर संबंधित रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना खास कोविड रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण आता सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी घरातच विलगीकरण पद्धतीने ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कशा पद्धतीने याचा अवलंब केला जावा, याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एखाद्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणे दिसण्यापूर्वीची स्थिती आहे, हे केवळ डॉक्टरच ठरवू शकतात. त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे. सामान्य नागरिक हे ठरवू शकणार नाहीत.

संबंधित रुग्णाच्या घरी एक रुग्ण विलगीकरण पद्धतीने ठेवण्याची पूर्ण व्यवस्था हवी. या रुग्णाचा घरातील कोणत्याही व्यक्तीशी अजिबात संपर्क येता कामा नये, अशीही सोय असली पाहिजे.  

संबंधित घरामध्ये एक व्यक्ती केअरटेकर म्हणून २४ तास उपलब्ध असली पाहिजे. संबंधित केअरटेकर आणि कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय यांच्यात संपर्क असला पाहिजे. गरजेप्रमाणे एकमेकांना बोलता आले पाहिजे.

संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेले सर्व नातेवाईक आणि केअरटेकर यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध दिले पाहिजे. औषधाचे किती डोस द्यायचे हे संबंधित डॉक्टर ठरवतील.

रुग्णाच्या आणि इतरांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केलेले असले पाहिजे. त्याचबरोबर या ऍपमधील ब्लूटूथ सतत सुरू असला पाहिजे. हे ऍप सतत ऍक्टिव्ह हवे.

कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...

संबंधित रुग्णाने स्वतःच्या तब्येतीबद्दल, सुधारणेबद्दल जिल्हा किंवा स्थानिक प्रशासनाला रोजच्या रोज माहिती दिली पाहिजे.

संबंधित रुग्णाने घरातच विलगीकरण होण्यापूर्वी तसे प्रतिज्ञापत्र लिहून दिले पाहिजे. आणि विलगीकरणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

जर लक्षणे बळावली तर काय करायचे?
घरातील विलगीकरणाच्या काळात जर रुग्णामधील लक्षणे बळावली. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. छातीत दुखू लागले. चेहरा किंवा ओठ निळे पडले तर लगेचच कोविड प्रतिबंधक रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. 

घरातील विलगीकरण कधी संपवायचे?
जर रुग्णातील लक्षणे पूर्णपणे संपली. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची चाचणी केली आणि या चाचणीचे निकाल सलग दोनदा निगेटिव्ह आले तरच घरातील विलगीकरण संपवता येईल, असे या निर्देशात म्हटले आहे.