पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी

भगतसिंह कोश्यारी

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती केली आहे. कोश्यारी यांच्यासह देशातील आणखी काही महत्वाच्या राज्यातील राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळच्या राज्यपालपदी माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान, बंडारु दत्तात्रय यांची हिमाचल प्रदेशच्या तर तेलंगणाच्या राज्यपालपदी तमिलसाई सुंदरराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्र यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. 

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यानंतर कोश्यारी हे राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारतील. कोश्यारी हे उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री होण्याबरोबरच २००२ ते २००७ पर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी सांभाळले आहे.

आरिफ मोहम्मद खान यांची प्रगतशील मुस्लीम चेहरा अशी ओळख आहे. त्यांनी तिहेरी तलाक सारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडले होते. मुळ काँग्रेस नेते असलेले आरिफ मोहम्मद खान हे दीर्घ काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. १९८४ मध्ये शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाला संसदेद्वारे कायदा करुन बदलल्याच्या विरोधात त्यांनी केंद्रीय मंत्रिपद सोडले होते. 

आरिफ मोहम्मद खान यांनी वंदे मातरमचे उर्दू भाषांतरही केले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत केरळचे राज्यपाल असलेले माजी सरन्यायाधीश पी. सदाशिवम हे कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:new Governor appointed and transferred in Rajasthan Maharashtra bhagat singh koshyari Himachal