पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप अध्यक्षपदासाठी या दोघांची नावे चर्चेत

अमित शहा

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होतानाच पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अमित शहा आता केंद्रीय मंत्री झाल्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये 'एक व्यक्ती, एक पद' असा नियम आहे. त्यामुळे एकावेळी एक व्यक्ती एकाच पदावर राहू शकते. त्याला दुसऱ्या पदाचा त्याग करावा लागतो. आता अमित शहांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. अमित शहांच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे अध्यक्षपदासाठी दोघांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये एक नाव आहे जे पी नड्डा आणि दुसरे आहे भूपेंद्र यादव यांचे. हे दोघेही पक्षाच्या कार्यपद्धतीशी परिचित आहेत.

भूपेंद्र यादव यांनी अमित शहांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी गुजरात आणि बिहार या दोन राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या विजयात त्यांचा वाटा मोठा होता. अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून भूपेंद्र यादव ओळखले जातात.

कष्टाचे फळ!, नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शहा

गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी अमित शहा यांनी सांभाळली होती. त्यावेळी तेथील ८० पैकी ७१ जागांवर भाजपचे उमेदवार यशस्वी ठरले होते. त्यावेळी केंद्रात एकहाती सत्ता मिळवण्यात भाजपला उत्तर प्रदेशात मिळालेले यश महत्त्वाचे ठरले होते. यावेळी उत्तर प्रदेशची जबाबदारी जे पी नड्डा यांच्याकडे सोपविण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत तिथे सपा-बसपा या दोन्ही पक्षांची युती असतानाही भाजपने या राज्यात ६२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नड्डा यांच्या कामाचे पक्षात कौतुक केले जात आहे. 

सुषमा स्वराज यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानताना लिहिले...

जे पी नड्डा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात सक्रिय आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते. मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री सुद्धा होते. पक्षाच्या संघटनात्मक गोष्टींवर त्यांची चांगली पकड आहे. याआधीही जे पी नड्डा यांचे नाव पक्षाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आले होते. पण त्यावेळी ही माळ अमित शहा यांच्या गळ्यात पडली होती.