पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराकमधील इराण समर्थक सैनिकांवर हवाई हल्ला, ६ ठार

याच ठिकाणी शनिवारी पहाटे हवाई हल्ला करण्यात आला.

बगदाद विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणचे वरिष्ठ कमांडर कासिम सोलेमानी शुक्रवारी पहाटे मारले गेले. यामुळे इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असतानाच अमेरिकेने शनिवारी इराकमध्ये हवाई हल्ला केला. इराकमधील इराण समर्थक सैनिकांवर हवाई हल्ला केल्याची माहिती आहे. यामध्ये सहा जण ठार झाले.

३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा - लष्करप्रमुख

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या क्वाड फोर्सचे कमांडर कासिम सोलेमानी शुक्रवारी पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यात मारले गेले. आपण कासिम सोलेमानी यांना मारण्याचे आदेश दिले होते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. या हल्ल्यानंतर इराकमधील इराणसमर्थक सैन्यदलावर हल्ला करण्यात आला आहे. इराकमधील सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मोटारींवर या हल्ल्यांमध्ये निशाणा साधण्यात आला. या मोटारींमध्ये इराण समर्थक सैनिक होते. हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

'आपल्या राज्यघटनेचा मसुदा ब्राह्मण व्यक्तीनेच लिहिला होता'

दरम्यान, आपल्याला इराणशी युद्ध करायचे नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कासिम सोलेमानी यांना मारण्याचे आदेश हे पुढील संभाव्य युद्ध टाळण्यासाठी होते. युद्ध करण्यासाठी अजिबात नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिका कायम सतर्क आहे. जर इराणने कोणताही प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याल अमेरिका चोख प्रत्युत्तर देईल, असाही इशारा त्यांनी दिला.