पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अडवाणींचा आज ९२वा वाढदिवस; पंतप्रधान मोदी, अमित शहा निवासस्थानी

अडवाणींचा आज ९२वा वाढदिवस; पंतप्रधान मोदी, अमित शहा निवासस्थानी

राम मंदिर आंदोलनासाठी रथयात्रा काढलेले माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा आज ९२ वा वाढदिवस आहे. भाजपचे लोहपुरुष अशी ओळख असलेल्या या दिग्गज नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्याबरोबर भाजप अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा हेही उपस्थित होते. 

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन अडवाणी हे बुद्धिमान, दिग्गज राजकारणी आणि देशातील सर्वांत सन्मानित नेत्यांपैकी एक असल्याचे म्हटले. एकापाठोपाठ एक ट्विट करुन त्यांनी अडवाणींचे कौतुक केले. ते म्हणाले, नागरिकांना सशक्त करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे योगदान भारत सदैव स्मरणात ठेवेल. जन्मदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्याबाबत प्रार्थना करतो.

अडवाणींच्या योगदानाबाबत ते म्हणाले की, त्यांनी अनेक दशकांपर्यंत भाजपचा विस्तार आणि आकार देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. गेल्या काही वर्षांत आमचा पक्ष देशात महत्त्वाच्या भूमिकेत आला आहे. यामागे अडवाणींसारखे नेते आणि त्यांनी तयार केलेल्या लाखो निःस्वार्थ कार्यकर्त्यांचे योगदान आहे.

त्यांनी जनसेवा करताना नेहमी मूल्यांकडे लक्ष दिले. आपल्या मूळ विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. लोकशाहीच्या संरक्षणाबाबत जेव्हा बोलले जाते, तेव्हा ते पहिल्या रांगेत येतात. एक मंत्री, एक प्रशासक म्हणून त्यांच्या योगदानाचा प्रत्येक ठिकाणी गौरव झाला आहे.